या मंदिरात आपल्या दोन पुत्रांसह विराजमान आहेत गणेश

आपल्या देशात प्रत्येक गावात किमान एक गणेश मंदिर आहे. त्यातील अनेक मंदिरे खास आहेत. बऱ्याच ठिकाणी गणेश, पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्यासह विराजमान आहेत. मध्यप्रदेशातील महेश्वर येथे नर्मदा काठी एक खास गणेश मंदिर असून या मंदिरात गणेश त्यांचे दोन पुत्र शुभ आणि लाभ यांच्या सह विराजमान आहेत. देशातील या स्वरूपाचे बहुदा हे एकमेव मंदिर आहे असे म्हणतात.

खरगोन जिल्यातील महेश्वर येथे नर्मदेच्या उत्तर काठावर असेलेले हे मंदिर देशभरात प्रसिद्धीस आले आहे. गणेशोत्सवात येथे मोठी गर्दी होते. या मंदिराभोवती बोरांची खूप झाडे आहेत आणि येथे देवाचा प्रसाद म्हणून बोरेच देण्याची प्रथा आहे. येथे दर महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला सुद्धा बोर चतुर्थी असे म्हटले जाते. येथील विशेष असे सांगतात, ज्या भाविकांना स्वतःचे घर हवे अशी इच्छा आहे ते येथे नर्मदा नदीतून दगड काढून मंदिराच्या परिसरात दगड एकावर एक रचून चिमुकले घर बनवितात. मनोकामना पूर्ण झाली कि पुन्हा एकदा गणेश दर्शनाला येऊन दगडाचे घर बांधले जाते.