डार्क वेबवर ‘लाइव रेप व्हिडीओ’ चलतीत

इंटरनेटच्या माध्यमातून कोणतेही ठोस पुरावे न सोडता मशीनगन पासून मिसाईल पर्यंत आणि ड्रग, सेक्स रॅकेटस, चाईल्ड पोर्न पर्यंत वाट्टेल ते विकणारी दुकाने म्हणजे डार्क वेब. या डार्क वेबचा आणखी एक क्रूर चेहरा आता समोर आला असून लहान मुलींवर रेप केल्याचे लाईव्ह व्हिडीओ येथे मोठ्या प्रमाणावर दाखविले जात आहेत. चाईल्ड पोर्न मुळे या मासूम जीवांची जिंदगी बरबाद होते आहेच पण धक्कादायक म्हणजे या साईटस ना दररोज २५ लाख व्हिजिटर्स भेट देतात अशी आकडेवारी समोर आली आहे. असल्या व्हिडीओ मधून करोडोंची कमाई केली जात आहे.

डार्क वेब इंटरनेट या मायाजालाचा असा भाग आहे जेथे गुगल काम करू शकत नाही. येथे पासवर्डच्या जागी इनक्रीप्टेड कोड असतो आणि क्रीप्टोग्राफीच्या सहाय्याने येथील माहिती सिक्रेट कोड मध्ये बदलली जाते. ज्याच्याकडे या सिक्रेट कोडचा अॅक्सेस असतो तो या साईट पाहू शकतो. येथील युआरएल क्षणाक्षणाला बदलतात त्यामुळे तपास यंत्रणा त्या ट्रॅक करू शकत नाहीत. याचाच फायदा अंडरवर्ल्ड मधील डॉन, अवैध शस्त्र विक्री करणारे, अमली पदार्थ विक्री- खरेदी करणारे, चाईल्ड पोर्न, तरुण मुलीना जाळ्यात ओढून त्यांचे अश्व्लील व्हिडीओ बनविणारे अशी सर्व काळी कृत्ये करणारे घेतात.

इंटरपोलने अशी माहिती देणारी ‘अल्फा बे’ ही साईट यशस्वी रित्या बंद केली असली तरी आजही अश्या हजारो साईट सुरूच आहेत. हॅक फोरम, द रियल डार्क मार्केट, मजाफाका, डार कोड अश्या साईट आजही सुरु आहेत. या वेबवर साईट वरील माहिती देण्यासाठी ६ कोटी जाहिराती आहेत आणि त्यासाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला जातो असेही समजते. रेप व्हिडीओ लाइव दाखविले जातात त्यामुळे त्यांचे पुरावे मिळत नाहीत कारण फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड केलेच जात नाहीत असे तपास यंत्रणाचे अधिकारी सांगतात. भारतात सुद्धा असल्या व्हिडीओंचे प्रमाण वाढत चालले असून १२ ते १७ वयोगटातील मुली आणि मुलांना त्यासाठी लक्ष्य केले जात आहे असे समजते.