Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर 25 लाखांचे बक्षीस, डी कंपनीच्या या सदस्यांवर एनआयएचे बक्षीस जाहीर


मुंबई : तीन दशकांहून अधिक काळ पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दाऊद इब्राहिमचा भारतीय गुप्तचर संस्था शोध घेत आहेत. आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने दाऊदवर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर दाऊद आणि त्याच्या साथीदारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एनआयएने दाऊद टोळीतील आणखी काही गुन्हेगारांवरही असेच बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार दाऊद टोळीचे सदस्य भारतात बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. ज्यामध्ये अवैध शस्त्रास्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट चलनाची तस्करी यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर दाऊद पाकिस्तानी एजन्सी आयएसआय आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने भारताविरुद्ध दहशतवादी कारवायाही करतो.

15 ते 25 लाखांचे बक्षीस
एनआयएच्या या यादीत दाऊद इब्राहिमचे भाऊ अनीस इब्राहिम आणि हाजी अनीस, त्याचा खास जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, शकील शेख उर्फ ​छोटा शकील आणि इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक मेनन उर्फ टायगर मेनन यांच्यावर हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. डॉन दाऊद इब्राहिमवर एजन्सीच्या वतीने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे, तर छोटा शकीलवर 20 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर अनीस चिकना आणि मेनन यांसारख्या इतर आरोपींवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

आधीच ठेवण्यात आले आहे बक्षीस
अंडरवर्ल्ड डॉन व्यतिरिक्त दाऊद इब्राहिमलाही काही वर्षांपूर्वी जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले होते. दाऊद सध्या कराची, पाकिस्तानमध्ये राहतो. मात्र, पाकिस्तानने ही वस्तुस्थिती साफ नाकारली आहे. भारत दाऊद इब्राहिमला अनेक प्रकरणांमध्ये शोधत आहे, ज्यात तो थेट दोषी आहे. ज्यामध्ये 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे प्रकरण सर्वात महत्त्वाचे आहे. याआधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 2003 मध्ये दाऊदवर 2.5 मिलियन डॉलरचे इनामही जाहीर केले होते.