Cervical Cancer Vaccine : गर्भाशयाच्या कर्करोगाची पहिली स्वदेशी लस भारतात लाँच, कधी होणार उपलब्ध आणि किती असेल त्याची किंमत ?


पुणे : गर्भाशयाच्या कर्करोगाची लस येत्या काही महिन्यांत उपलब्ध होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी गुरुवारी माहिती दिली की पुढील काही महिन्यांत गर्भाशयाच्या कर्करोगाची लस उपलब्ध होईल. ते म्हणाले की, ही लस आधी देशात दिली जाईल आणि नंतर ती जगाला दिली जाईल.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लस विकसित करणे हे एक मोठे यश आहे. आजचा दिवस वैद्यकीय शास्त्रासाठी मोठा मानला जातो. आदर पूनावाला म्हणाले की, भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीची किंमत 200 ते 400 रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, दर अद्याप ठरलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

’20 कोटी डोस तयार करण्याची तयारी’
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला म्हणाले की, येत्या दोन वर्षांत 20 कोटी डोस तयार करण्याची तयारी सुरू आहे. गर्भाशयाच्या कर्करोगासाठी ‘मेड इन इंडिया’ लसीबद्दल तज्ञांमध्ये खूप उत्साह आहे.


गर्भाशयाच्या कर्करोगासाठी पहिली स्वदेशी लस
विशेष म्हणजे, देशात गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्धची लढाई आता सोपी होणार आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी भारताला पहिली स्वदेशी लस मिळाली आहे. ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने बनवली आहे.

गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय?
गर्भाशयाचा कर्करोग हा एक प्रकारचा कर्करोग आहे, जो ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) जो लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. गर्भाशयाचा कर्करोग होण्यासाठी हा विषाणू सर्वाधिक जबाबदार असतो. असे सांगितले जात आहे की ही लस प्रथम 9 ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाऊ शकते.

गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यास मदत करणार लस
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. एका अहवालानुसार, 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश केल्यास महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरू शकते.