२०३० पर्यंत भारतीय रस्यांवर येणार ५ कोटी इलेक्ट्रिक वाहने

देशात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वेगाने वाढ होत असून २०३० पर्यंत भारतीय रस्त्यांवर ५ कोटी पेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहने धावतील असे केपीएमजी इंडिया रिपोर्ट मध्ये नमूद केले गेले आहे. सध्या देशापुढे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हे आव्हान आहे पण ज्या प्रकारे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत ते पाहता चार्जिग नेटवर्क विकासाचे काम जलद गतीने केले जाईल असेही यात म्हटले गेले आहे.

केपीएमजीचे सल्लागार रोहन राव या संदर्भात बोलताना म्हणाले, जगात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग नेटवर्क वेगाने वाढत आहे आणि भारतात सुद्धा वेगाने हे नेटवर्क उभारले जाईल. सार्वजनिक आणि खासगी चार्जिंग नेटवर्क उभारताना ग्राहक सेग्मेंट व उपयोग यांचा आधार घेतला गेला आहे. बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणावर गेला जाण्याची शक्यता आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन विक्री वाढली आहेच. पण त्यात सध्या इलेक्ट्रिक दुचाकी संख्या जास्त आहे. २०२० मध्ये १ लाख ५२ हजार दुचाकी विकल्या गेल्या तर २०२१ मध्त्ये १,४४००० व आता २०२२ मध्ये हीच संख्या २,३१००० वर गेली आहे.

कार सेग्मेंट बद्दल बोलायचे तर ग्राहकांना इलेक्ट्रिक कार्सच्या किमती अजून कमी होण्याची प्रतीक्षा आहे. साधारण १० लाखापर्यत ग्राहकाची तयारी आहे. तुफान विक्री होत असलेली टाटांची नेक्सोन १४.५० लाख पासून उपलब्ध आहे. महिंद्र आणि मारुती कमी किमतीच्या कार्स आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ओलाने नवी कार बाजारात आणत असल्याची घोषणा केली असून ही कार फुल चार्ज मध्ये ५०० किमी धावेल असा दावा केला आहे.