Success Story : 3 मित्रांनी सुरू केला 2 लाख रुपयात ऑनलाइन बेकरी व्यवसाय, आज होते 75 कोटींची उलाढाल


बेकिंगो या ऑनलाइन बेकरी उत्पादनांची विक्री करणाऱ्या कंपनीने यशाचे शिखर गाठले आहे. 2016 मध्ये 3 मित्रांनी सुरू केलेल्या बेकिंगोची 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 75 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. सध्या कंपनी 11 शहरांमध्ये आपली सेवा देत आहे. याशिवाय या वर्षी कंपनीने दिल्लीत आपले पहिले आउटलेटही उघडले आहे.

बेकिंगोची स्थापना 2016 मध्ये दिल्लीस्थित हिमांशू चावला, शेरी सहगल आणि सुमन पात्रा यांनी केली होती. तिघेही दिल्लीतील नेताजी विद्यापीठात एकत्र शिकले होते. काही दिवस खासगी नोकरीही केली. पण, नंतर तिघांनीही नोकरी सोडली आणि 2010 मध्ये फ्लॉवर ओरा हा त्यांचा पहिला उपक्रम सुरू केला. फुले, केक आणि वैयक्तिक भेटवस्तू ऑनलाइन पुरवणे हे त्यांचे काम होते.

बेकिंगो 2016 मध्ये लॉन्च झाला
एनडीटीव्ही प्रॉफिटने दिलेल्या वृत्तानुसार, शेरीने सांगितले की, 2010 च्या व्हॅलेंटाईन डेला फ्लॉवर ओराला खूप ऑर्डर मिळाल्या. शेरी म्हणाला की त्या दिवशी त्याने आणि हिमांशूने दिल्ली आणि एनसीआरमध्ये 50 टक्के ऑर्डर वितरित केल्या, कारण त्यांच्याकडे एकच कर्मचारी होता. तेव्हाच फ्लॉवर ओरासोबत बेकरी डिलिव्हरीसाठी काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्याच्या मनात आला.