नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून देशाचे पंतप्रधान झाले आहेत, तेव्हापासून लोकांमध्ये त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ते काय खातात, काय घालतात, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट कोण हाताळते? या सर्व गोष्टींबाबत लोकांना माहिती हवी आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दलच्या त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या रंजक आहेत.
PM Modi Daily Expenses : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी
कोण उचलतो पंतप्रधान मोदींच्या जेवणाचा खर्च?
एका आरटीआयमध्ये पंतप्रधान मोदींच्या जेवणाच्या किमतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. आरटीआयला उत्तर देताना अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी स्वतः त्यांच्या जेवणाचा खर्च उचलतात. म्हणजेच त्यांच्या जेवणावर सरकारचा कोणताही खर्च होत नाही.
पंतप्रधान मोदींना काय खायला आवडते?
2015 मध्ये आरटीआयच्या उत्तरात माहिती अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी गुजराती खाद्यपदार्थ पसंत करतात. ते त्यांचा स्वयंपाकी बद्री मीनाने बनवलेले अन्न खातात. पंतप्रधानांना बाजरीची भाकरी आणि खिचडी खायला आवडते.
पंतप्रधानांनी आतापर्यंत किती सुट्या घेतल्या आहेत?
पीएम मोदींच्या सुट्यांची माहिती आरटीआयद्वारे मागवण्यात आली होती. यावर उत्तर देताना पीएमओने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी अद्याप कोणतीही सुट्टी घेतलेली नाही.
किती तास काम करतात मोदी ?
एका आरटीआयमध्ये पीएम मोदींच्या कामाच्या तासांची माहिती मागवण्यात आली होती. तेव्हा पीएमओने सांगितले होते की, असे म्हणता येईल की, पंतप्रधान सर्व वेळ ड्युटीवर असतात. 2015 मध्ये आणखी एका आरटीआयमध्ये पीएमओमध्ये इंटरनेट स्पीडची माहिती मागवण्यात आली होती. याचेही उत्तर देण्यात आले. उत्तरात पीएमओचा इंटरनेट स्पीड 34 एमबीपीएस असल्याचे सांगण्यात आले.