लालबागच्या राजाचे दर्शन घेणारा कार्तिक आर्यन ठरला पहिला सेलिब्रिटी, हात जोडून म्हणाला- तू आयुष्य बदललेस बाप्पा


गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दरबारी हजेरी लावण्यासाठी पोहोचला. 2022 मध्ये, जिथे बॉलीवूड चित्रपटांची स्थिती खराब होत आहे, अशा वेळी कार्तिकने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट दिला आहे. या बॉलिवूड स्टारसाठी हे वर्ष कमालीचे ठरले. कोरोना महामारीमुळे देशभरात दोन वर्षांपासून हा उत्सव लांबणीवर पडला असतानाच, यंदा मुंबईत गणेशोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. कार्तिक आर्यनने मुंबईतील बहुचर्चित लालबागच्या राजाच्या दरबारी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर लालबागच्या राजाच्या दरबारामधील त्याचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘गणपती बाप्पा मोरया!!! #LalBaugchaRaja चे पहिले दर्शन घेऊन धन्य झालो. हे वर्ष आयुष्य बदलणारे बनवल्याबद्दल बाप्पाचे आभार. माझ्या सर्व मनोकामना तुम्ही अशाच पूर्ण करत राहाल अशी आशा आहे.


या वर्षीच्या गणेश उत्सवादरम्यान लालबागच्या राजाला भेट देणारा कार्तिक आर्यन हा पहिला सेलिब्रिटी ठरला आहे. कोरोना महामारीमुळे लालबागच्या राजाचा दरबार दोन वर्षांपासून दर्शनासाठी बंद होता. अशा परिस्थितीत दरबार उघडताच कार्तिक आर्यन बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला.

‘भूल भुलैया 2’ नंतर बाप्पाने भरली कार्तिकची झोळी
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यनचे नशीब आणि मेहनत यामुळे त्याची झोळी भरली आहे. त्याचा ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे, तर त्याच्याकडे ‘शहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ सारखे मोठे चित्रपट आहेत. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यनची चाहता वर्गही खूप वाढला आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार आहे कार्तिक आर्यन
इतकंच नाही तर कार्तिक आर्यन दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपट ‘फ्रेडी’, ‘कॅप्टन इंडिया’मध्येही काम करणार आहे. एकंदरीत बाप्पाने कार्तिकची झोळी खऱ्या अर्थाने भरली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा राहणारा हा अभिनेता ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून चर्चेत आला होता. लव रंजनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या त्या चित्रपटात कार्तिकच्या 5 मिनिटांच्या एकपात्री अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती.