Jacqueline Extortion Case : 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाने पाठवले समन्स, कोर्टात हजर राहण्याचे आदेश


चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 215 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला समन्स बजावले आहे. न्यायालयाने या प्रकरणी अभिनेत्रीला 26 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. नुकतेच या प्रकरणी तपास यंत्रणेने कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनचेही नाव होते. याच आधारे कोर्टाने अभिनेत्रीला समन्स बजावले आहे.

215 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीने बनवले आरोपी
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या महिन्याच्या सुरुवातीला तिहार तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर सुकेश चंद्रशेखरशी संबंधित सुमारे 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आरोपी म्हणून नाव दिले होते. सुकेशसोबतच्या कथित संबंधांबाबत जॅकलिनची ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे. काही काळापूर्वी जॅकलिनची 12 लाखांची एफडीही जप्त करण्यात आली होती.