Income Tax Raid : उत्तर प्रदेशमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई, आयकर विभागाने टाकले 22 ठिकाणी छापे


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इन्कम टॅक्सने एकाच वेळी 22 ठिकाणी छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ, कानपूरसह दिल्लीत आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यात अनेक भ्रष्ट नोकरशहा आयकराच्या रडारवर आहेत. अनेक विभागात काम करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, UPICON शी संबंधित कंत्राटदारांवर आयकर छापा टाकण्यात आला आहे.

प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईत उत्तर प्रदेशांतर्गत अनेक विभागांमध्ये कार्यरत सुमारे दीड डझन अधिकारी-कर्मचारी रडारवर आले आहेत. येथे उद्योग विभाग, उद्योजकता विकास संस्था, उद्योजकता प्रशिक्षण संस्था, यूपी इंडस्ट्रियल कन्सल्टंट लिमिटेड आणि खाजगी क्षेत्रातील काही संस्था आहेत.