आता प्रत्येकाच्या खिशात दिसू शकतो आयफोन! Apple ने कमी केल्या iPhone 13, iPhone 12, iPhone 11 च्या किमती


जगातील प्रसिद्ध टेक कंपनीपैकी एक असलेली अॅपल पुढील महिन्यात आपली आयफोन सीरीज लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 7 सप्टेंबरला Apple कंपनी iPhone 14 ची घोषणा करणार आहे. आयफोन चाहत्यांसाठी, ही एक वेळ आहे, जेव्हा आयफोन फोनच्या जुन्या आवृत्तीची किंमत देखील कमी होऊ शकते. साधारणपणे अॅपल कंपनी आपला लेटेस्ट आयफोन लॉन्च केल्यानंतर आपल्या जुन्या आयफोनच्या किमतीत कपात करत असते. जरी iPhone 14 लाँच होण्यासाठी अजून काही वेळ बाकी आहे, परंतु Flipkart वर काही डील आधीच सुरू आहेत ज्याद्वारे वापरकर्ते Apple चे जुने व्हर्जन जसे की iPhone 13, iPhone 12 आणि iPhone 11 सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात.

आयफोन 13
अॅपलचा हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झाला होता. या स्मार्टफोनचा आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम स्मार्टफोनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. हा फोन लॉन्च झाला, तेव्हा त्याची किंमत 79,900 रुपये होती. तथापि, हा Apple स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 65,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो, म्हणजेच जर वापरकर्त्यांना हवे असेल, तर ते 13,901 रुपयांच्या सवलतीत हा फोन खरेदी करू शकतात. मात्र, ही सूट आणखी वाढवता येऊ शकते. वास्तविक, जर वापरकर्त्यांकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर या डीलवर 1,000 रुपयांची सूट देखील मिळू शकते. तथापि, जर वापरकर्त्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असेल, तर वापरकर्त्यांना या डीलमध्ये 5 टक्के अमर्यादित कॅशबॅक मिळू शकतो म्हणजेच 3,300 रुपयांची सूट मिळू शकते, ज्यामुळे वापरकर्ते 62,699 रुपयांमध्ये iPhone 13 खरेदी करू शकतात.

आयफोन 12
जरी आयफोन 12 लाँच होऊन दोन वर्षे झाली असली, तरीही हा स्मार्टफोन खूप शक्तिशाली डिव्हाइस मानला जातो आणि बऱ्याच नवीनतम Android स्मार्टफोनवर भारी आहे. हा स्मार्टफोन दोन वर्षांपूर्वी लॉन्च झाला, तेव्हा या स्मार्टफोनची अधिकृत किंमत 65,900 रुपये होती. तथापि, फ्लिपकार्ट डीलच्या मदतीने, हा फोन आता 59,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो आणि 5,901 रुपयांची मोठी सूट मिळू शकते. विशेष बाब म्हणजे या आयफोन फोनसोबत एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड डील देखील लागू करता येतील.

आयफोन 11
आजही अनेक यूजर्स iPhone 11 ला प्राधान्य देत आहेत. हा कदाचित अनेक नवीनतम Android स्मार्टफोन्सइतका शक्तिशाली नसेल, परंतु आयफोन म्हणून वापरकर्त्यांसाठी हा एक अतिशय परवडणारा आणि किफायतशीर स्मार्टफोन मानला जाऊ शकतो. गेल्या वर्षी आयफोन 11 बाजारातून बाहेर काढण्याऐवजी, Apple ने त्याच्या किंमती कमी केल्या होत्या आणि त्याची किंमत 49,900 रुपये केली होती. तथापि, iPhone 11 फ्लिपकार्टवर 39,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो म्हणजेच या फोनवर 9,901 ची सूट मिळेल. खास गोष्ट म्हणजे जर यूजर्सला अतिरिक्त सूट हवी असेल, तर या फोनवर HDFC बँक आणि Flipkart Axis बँक डील देखील लागू करता येतील.