या वादग्रस्त ट्विटमुळे केआरकेला करण्यात आली अटक, ऋषी कपूरबद्दल केले होते वादग्रस्त ट्विट


स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान हे नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतो. काहीवेळेस केआरकेला ट्विट करणे भारी पडते. अनेकवेळा सेलिब्रिटींनी त्याच्यावर मानहानीचे खटलेही दाखल केले आहेत. यावेळी केआरकेच्या अडचणी काहीशा वाढल्या आहेत. 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे KRK ला अटक करण्यात आली आहे. केआरकेला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली असून त्यानंतर त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 2020 मध्ये केआरकेने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल ट्विट केले होते, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

केआरके केवळ त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. त्याच्यावर अनेक एफआयआरही दाखल आहेत. 2020 मध्ये केआरकेने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कानल यांनी तक्रार दाखल केली होती.

या ट्विटमुळे करण्यात आली अटक
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, 30 एप्रिल 2020 रोजी केआरकेने ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्याबद्दल ट्विट केले होते. त्यांनी ट्विट केले होते- सर, बरे व्हा आणि लवकर परत या, निघून जाऊ नका, कारण दोन-तीन दिवसांनी दारूचे दुकान उघडणार आहे. एवढेच नाही तर इरफान खानच्या मृत्यूपूर्वी त्याने त्याच्याबद्दलही ट्विट केले होते.

या कलमान्वये गुन्हा दाखल
पीटीआयशी संवाद साधताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही केआरकेविरुद्ध आयपीसी कलम 294 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्याने दोन्ही कलाकारांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. केआरके हेडलाईन्सचा भाग बनण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही काळापूर्वी त्याने सलमान खानच्या राधे या चित्रपटाचा नकारात्मक रिव्ह्यू दिला होता, त्यानंतर सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.