शाहरुखच्या नावाने ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात स्कॉलरशिप

बॉलीवूड शेहेनशहा शाहरुख खान याचा बॉलीवूड बरोबरच अनेक सामाजिक कार्यात सुद्धा सहभाग आहे. ऑस्ट्रेलियातील ट्रोब युनिव्हर्सिटी मध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी शाहरुख खान यांच्या नावाने स्कॉलरशिप दिली जात असून २०१९ पासून ही स्कॉलरशिप दिली जाते. मध्यंतरी त्यात खंड पडला होता पण आता २०२२ पासून ती पुन्हा सुरु झाली आहे. या स्कॉलरशिपसाठीची नोंदणी १८ ऑगस्ट पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर आहे.

जे भारतीय विद्यार्थी त्यांच्या संशोधनाने जगावर प्रभाव टाकू शकतील अश्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न आणि ला ट्रोब युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१९ मध्ये ही शिष्यवृत्ती केरळच्या त्रिसूर येथील गोपिका कोटनथारायाल हिला दिली गेली होती. त्या कार्यक्रमात शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि राजकुमार हिरानी सामील झाले होते.

यदा या स्कॉलरशिप साठी आतापर्यत ८०० अर्ज आले आहेत. अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय नागरिक आणि रहिवासी हवा. द्विपदवीधर पदवी मिळाल्यापासून दहा वर्षात या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. यात संबंधित विद्यार्थ्याला चार वर्षांची संपूर्ण फी दिली जाते. ला ट्रोब जगातील नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे.