पोको एम ५ स्मार्टफोन, ५ सप्टेंबरला भारतात

शाओमीने पोको एम ५ स्मार्टफोन लाँच तारीख जाहीर केली असून येत्या ५ सप्टेंबरला हा फोन भारतीय बाजारात दाखल होत आहे. कंपनीने एम थ्री सिरीज डिझाईनचा खुलासा केला असून एम सिरीज मधला पोको एम ५ हा फोन या सेग्मेंट मधील पॉवरफुल फोन असल्याचा दावा केला आहे. या फोनच्या काही फीचर्ससचा खुलासा कंपनीने केला आहे. ५ तारखेला सायंकाळी ५.३० मिनिटांनी या फोनचे व्हर्च्युअल लाँचिंग केले जाणार आहे. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

या फोन साठी ६.८५ इंची फुल एचडी प्लस एलसीडी पॅनल आहे. ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, चिक लेदरप्रमाणे बॅक पॅनल आहे. सुरक्षेसाठी पोको एमएस साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, ५००० एमएएच बॅटरी ३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. मिडिया टेक हेलिप जी ९९ एसओसी, अँड्राईड १२ बेस्ड एमआययुआय १३ ओएस आहे. रिअरवर मोठा कॅमेरा दिसत असून या फोनची किंमत साधारण १३ ते १४ हजार दरम्यान असेल असे म्हटले जात आहे.