सोनालीची संपत्ती ११० कोटी, आता लेकीच्या जीवाला धोका

गोवा येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या नावावर ११० कोटींची संपत्ती असून त्यामुळे आता त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या म्हणजे यशोधराच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे कुलदीप फोगाट यांचे म्हणणे आहे. यशोधरा होस्टेल वर राहून शिक्षण घेत होती पण आता आजीआजोबा घरी घेऊन आले आहेत. कुलदीप, यशोधराच्या सुरक्षेसाठी पोलीस सुप्रीटेंडेन्टची भेट घेऊन तिच्यासाठी सशस्त्र सुरक्षा रक्षकाची मागणी करणार आहेत.

कुलदीप म्हणाले ज्यांनी सोनालीचा खून केला तेच तिच्या मालमत्तेसाठी यशोधराच्या जीवाला धोका करू शकतात. सहा वर्षांपूर्वी सोनाली यांच्या पतीचा रहस्यमय मृत्यू झाला होता. सोनाली यांच्या वाट्याला पती संजय यांची १३ एकर जमीन आणि ६ एकरावरचे फार्म हाउस आणि रिसोर्ट आले होते. या जमिनीची किंमत ६ ते ७ कोटी प्रतीएकर म्हणजे सुमारे ९६ कोटी आहे. रिसोर्टची किंमत साधारण ६ कोटी आहे. सोनाली यांच्या नावावर साधारण तीन कोटींचे घर, दुकान आहे आणि स्कोर्पियो सह तीन कार्स आहेत.