मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी रविवारी एकामागून एक ट्विट करत आपला नवा बळी जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसले, तरी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या दिशेने होते. मोहित यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, 2006 मध्ये, 21 वर्षीय गब्रू जवानाने ग्रीन एकर्स रिसॉर्ट अंतर्गत 200 विविध प्रकारचे प्लास्टिक, डायमंड, सोने, बिल्डर, निर्यात, आयात, दारू ते चड्डीचा व्यवसाय सुरू केला. आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला त्यांचे नाव रेकॉर्डमध्ये टाकण्याची विनंती करतो.
मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर रोहित पवार? भाजप नेत्याच्या ट्विटमुळे तणाव वाढला
गबरू जवान का Business Model:- Maharashtra state co-op bank को 2007 se 2012 तक 1000 Cr का घाटा हुआ।इसी बैंक ने एक शुगर मिल को करोड़ों का लोन दिया। शुगर मिल ने पैसे दबा दिए तो 2012 में शुगर मिल को ऑक्शन किया और गबरू जवान की Baramati Agro ने कार्टेल बना कर सिर्फ़ 50Cr में ख़रीद लिया
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, गब्रू जवानाचे बिझनेस मॉडेल: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला 2007 ते 2012 पर्यंत 1000 कोटींचा तोटा झाला. या बँकेने साखर कारखान्याला कोट्यवधींचे कर्ज दिले. साखर कारखान्याने पैसे हडपले, म्हणून 2012 मध्ये साखर कारखान्याचा लिलाव झाला आणि गब्रू जवानाच्या बारामती अॅग्रोने कार्टेल बनवून अवघ्या 50 कोटींना विकत घेतला.
इसी शुगर फ़ैक्टरी ने फिर 150 crore का लोन ले लिया।
HDIL – PMC Bank – Patra Wala Chawl की कितनी शक्कर खायी है गबरू जवान ने यह भी जल्द पता चले गा !
ग़ज़ब का business model है भाई इस गबरू जवान का !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
रोहित पवारांचे प्रत्युत्तर
मोहित यांच्या आरोपांबाबत प्रसारमाध्यमांनी रोहित पवार यांना विचारले असता, सोशल मीडियाचा वापर प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. काही लोकांना त्याचे व्यसन लागले आहे. मला टार्गेट करणारे सर्व ट्विट केवळ प्रसिद्धीसाठी आहेत. ते म्हणाले की, मला आतापर्यंत कोणत्याही एजन्सीकडून नोटीस मिळालेली नाही. गेल्या 7 वर्षांत ग्रीन एकर्स कंपनीची विविध संस्थांकडून अनेकदा चौकशी करण्यात आली. त्यात काय चुकीच आहे? यापुढील काळातही या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाल्यास मी सहकार्य करत राहीन. विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही आणि त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नाही.