जगात इतक्या देशात आहेत चीनचे लष्करी अड्डे

कोणत्याही देशाची प्रबळता त्या देशाचे परकिय भूमीवर म्हणजे विदेशात किती लष्करी तळ आहेत यावरून ठरते. चीन या बाबत अतिशय आक्रमक धोरण राबवीत असून अनेक देशात चीन स्वतःचे लष्करी अड्डे स्थापित आहे. अमेरिका आणि भारत या दोन मुख्य शत्रूंवर दबाव आणणे हा त्यांचा यामागचा हेतू आहे. चीनने अनेक देशांना प्रथम कर्ज देऊन बांधील करून घेतले आहे आणि आता कर्ज रकमेच्या बदल्यात त्या त्या देशात महत्वाच्या ठिकाणी आपले लष्करी अड्डे उभे करत आहे. सालोमन बेटांवर याच मार्गाने चीनने नुकतचे त्याचे लष्करी तळ उभारले आहेत.

परदेशी भूमीवर लष्करी तळ उभारण्यात अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस पूर्वीपासूनचा आघाडीवर आहेत. हे देश पूर्वीपासूनचा सैन्य आणि आर्थिक महाशक्ती म्हणून आघाडीवर आहेत आणि आता त्या स्पर्धेत चीन अधिक आक्रमक बनल्याचे दिसत आहे. चीनने अनेक देशात अधिकृत ठाणी उभारलेली नाहीत मात्र त्या त्या देशांच्या सैनिकांबरोबर चीनी लष्कर तेथे तळ देऊन आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, श्रीलंका, म्यानमार, केनिया, नायजेरीया, कॅमरून, घाना, मालदीव हे देश. येथे चीनचे अधिकृत लष्करी तळ नाहीत मात्र सैन्याची उपस्थिती आहे.

अन्य देशात ताजीकीस्थान येथील गोर्नो बडरशा चौकी असून  वॉशिंग्टन पोस्टने येथील फोटोच जारी केले आहेत. अफगाणिस्थानच्या वर्वान पासून हे ठाणे जवळ आहे. हा भाग अफगाणिस्थान आणि काश्मीरला जोडतो. पाकव्याप्त काश्मीर मध्ये चीन सैन्य जम बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंबोडिया मध्ये थायलंड खाडी किनाऱ्यावर चीनने ९९ वर्षांच्या कराराने नेवल बेस बनविला असून कंबोडियाला दिलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या बदल्यात हा करार केला गेला आहे. येथून चीन त्याचा शत्रू विएतनामवर लक्ष ठेऊ शकतो.

दक्षिणचीन समुद्रात चीनची उपस्थिती आहेच. यामुळे भारताच्या अंदमान, निकोबार बेटांवर त्यांचे लक्ष आहे. हे अंतर केवळ १२०० किमी असून चीन येथे थेट मिसाईल डागू शकतो.आफ्रिकेतील जिबूती येथील नेवल बेस आता चीनने कार्यान्वित केला असून त्याचे फोटो उपग्रहाच्या माध्यमातून जगापुढे आले आहेत. येथे चीनच्या युध्दनौका पोहोचल्या आहेत. हा हिंद महासागराचा भाग असून येथून सुद्धा भारताला चीन आव्हान देऊ शकतो असे युद्ध तज्ञ सांगतात.