कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, 24 तासांत 9436 रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजारांवर


नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे, मात्र धोका अजूनही कायम आहे. कोविड-19 प्रकरणांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9 हजार 436 नवे रुग्ण आढळले आहेत, जे मागील दिवसाच्या तुलनेत कमी आहेत. 27 ऑगस्ट रोजी 9 हजार 520 बाधितांची नोंद झाली होती, तर दुसरीकडे, सक्रिय प्रकरणे पाहिल्यास हा आकडा 86 हजार 591 वर पोहोचला आहे.

कोरोना सक्रिय प्रकरणांमध्येही घट झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत 720 सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 27 ऑगस्ट रोजी 87 हजार 311 होते, ते आता 86 हजार 591 वर आले आहेत. जर आपण कोरोना विषाणूमुळे लोकांच्या मृत्यूबद्दल बोललो, तर गेल्या 24 तासात 41 लोकांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण प्रक्रियेला आला वेग
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 4,37,93,787 लोक बरे झाले आहेत. देशात लसीकरणाची प्रक्रियाही जोरात सुरू आहे. जर आपण साप्ताहिक सकारात्मकता दर पाहिला तर तो सध्या 2.70 टक्के आहे. त्याच वेळी, दैनिक सकारात्मकता दर 2.93 टक्के आहे. देशातही लसीकरणाला वेग आला असून आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 201.21 कोटी लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 88.50 कोटी लोकांची चाचणी घेण्यात आली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 22 हजार 551 लोकांची चाचणी करण्यात आली आहे.