व्हॉट्सअॅपवर केलेल्या या 5 चुका अॅडमिनला थेट टाकेल लॉकअपमध्ये


व्हॉट्सअॅप वापरणे किती धोकादायक आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला ही माहिती देत​आहोत. तुम्ही जर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्सना काही अतिरिक्त विशेषाधिकार आणि जबाबदाऱ्या असतात. या स्थितीत कोणत्याही ग्रुपवर चुकीचे काम होत असेल, तर ते थांबवण्याची जबाबदारी व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटरची आहे.

तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असल्यास, तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करण्यात येणारे फोटो, व्हिडिओ किंवा कंटेंटची माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या कामात गुंतलेले आढळल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्सनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

देशविरोधी सामग्री: व्हॉट्सअॅप ग्रुपवर देशविरोधी मजकूर शेअर करू नये. असे केल्याने, ग्रुप अॅडमिन आणि कंटेंट शेअर करणाऱ्या दोघांनाही अटक केली जाऊ शकते. या प्रकरणात तुरुंगवासही होऊ शकतो.

वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ: जर एखाद्याने कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक फोटो त्याच्या संमतीशिवाय ग्रुपवर टाकला आणि ग्रुप अॅडमिनही त्याबद्दल काहीच करत नसेल, तर असे केल्याने कंटेंट शेअर करणाऱ्याला आणि अॅडमिनला तुरुंगात टाकले जाऊ शकते.

हिंसा: हिंसाचार वाईटच आहे. जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखाद्याला धमकावले, तर तुम्हाला लॉकअपमध्ये जावे लागू शकते. याशिवाय कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा अपमान केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

पोर्नोग्राफी: व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचा अश्लील मजकूर पाठवला आणि ग्रुप अॅडमिनने कोणतीही कारवाई केली नाही, तर तुम्हाला तुरुंगात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा सामग्रीचा कोणत्याही प्रकारे प्रचार करणे कायद्याच्या विरोधात आहे.

फेक न्यूज: सरकार फेक न्यूज टाळण्याचा सल्लाही देते आणि फेक न्यूज आणि फेक कंटेंटवरही कडक बंदी घालण्यात आली आहे. फेक न्यूज पसरवणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागू शकते, असा नवा कायदा बनवण्यात आला आहे.