ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच स्कॉटलंडमध्ये होणार नव्या पंतप्रधानांची नियुक्ती

ब्रिटनच्या इतिहास यंदा प्रथमच ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांची नियुक्ती बकिंघम पॅलेस किंवा विंडसर कॅसल मध्ये होणार नाही तर ती स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसल मध्ये होणार आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या तब्येतीच्या काही समस्या निर्माण झाल्याने हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे. त्या दृष्टीने तयारीला सुरवात झाली आहे. येत्या ५ सप्टेंबरला नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होणार असून यंदा माजी परराष्ट्र मंत्री लीज ट्रस आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यात स्पर्धा आहे.

पंतप्रधान नावाची घोषणा होताच महाराणी एलिझाबेथ नव्या पंतप्रधानांची नियुक्ती बाल्मोरल कॅसल मध्ये करतील. महाराणी ९६ वर्षांच्या असून त्यांना तब्येतीच्या काही समस्या जाणवत आहेत. त्यामुळे डॉक्टर्सनी महाराणीना याच कॅसल मध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. महाराणी येथे उन्हाळा सुट्टी घालविण्यासाठी आल्या आहेत. अधिकारी आणि पंतप्रधान बोरिस जोन्सन ६ सप्टेंबरला स्कॉटलंडला रवाना होत आहेत.

या कॅसल मध्ये पंतप्रधान नियुक्तीची घोषणा करण्यामुळे ब्रिटनची परंपरा बदलणार आहे. बोरिस जोन्सन यांनी ७ जुलै रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. या पदासाठी अंतिम फेरीचे मतदान सप्टेंबरच्या सुरवातीपर्यंत सुरु राहणार असून निकालाची घोषणा ५ सप्टेंबरला केली जाणार आहे.