महागडे असूनही आयफोन खरेदीची म्हणून आहे क्रेझ
आयफोनची नवी मॉडेल दरवर्षी प्रमाणे यंदा सप्टेंबर मध्ये सादर केली जातील. दरवर्षी नवनवे आयफोन सादर होतात आणि त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांच्यात चढाओढ सुरु होते हा अनुभव येतो. आयफोनच्या किंमती अन्य स्मार्टफोनच्या तुलनेने जास्त आहेत तरीही ग्राहक या फोनसाठी दिवाने झाल्याचे दिसते या मागे अनेक कारणे सांगितली जातात. आयफोनची जुनी मॉडेलसुद्धा धडाक्याने विकली जातात आणि त्याला भारतासह जगातील कुठलाच देश अपवाद नाही.
युजर्स महागड्या आयफोनच्या खरेदीला प्राधान्य देतात त्याचे सर्वात मुख्य कारण सुरक्षा हे आहे. हॅकर्स सहजासहजी या फोन्सना निशाणा बनवू शकत नाहीत. त्यामुळे जगभरातील टॉप लीडर्स, सेलेब्रिटी, फिल्म स्टार्स पासून सर्वसामान्य युजर्सना सुद्धा आयफोन भरोश्याचे वाटतात. यात तुमची खासगी बोलणी किंवा माहिती फोनभेदी सहज ऐकू शकत नाहीत.
दुसरी बाब म्हणजे कॅमेरा. दुसऱ्या कंपनीचा कितीही भारी फोन घेतला आणि त्याला कितीही भारी कॅमेरा दिला असला तरी आयफोनच्या कॅमेरयातून ज्या क्वालिटीचे फोटो आणि व्हिडीओ शूट होतात त्याची तुलना होऊ शकत नाही. तिसरे म्हणजे अनेकदा स्लो प्रोसेसिंग स्पीड मुळे युजर्स हैराण असतात. आयफोन मध्ये ही समस्या येत नाही. अतिशय वेगवान प्रोसेसिंग ही त्याचे वैशिष्ट आहे. हे फोन क्वचितच हॅग होतात.
शेवटचे म्हणजे डिझाईन. नवा आयफोन येताच त्याचे डिझाईन ट्रेंड होऊ लागते. त्यामुळे मार्केट मध्ये येताच युजर्स आयफोन खरेदी करतोच असे दिसून येते. अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोन युनिक आणि मजबूत आहेत हेही एक कारण सांगता येते.