चमत्कार! आईबाप वेगळे, जुळी नाहीत तरी दोन बाळाचे डीएनए एकच

जगातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वेगळा असतो असे विज्ञान सांगते. एकाच आईबापाची, जुळी भावंडे यांचाही डीएनए थोडाफार मिळता जुळता असला तरी तो सारखाच असेल असे नसते. अमेरिकेत मात्र वैज्ञानिकाना बुचकळ्यात टाकणारी एक घटना घडली आहे. दोन मुले, ज्यांचे आईवडील वेगळे आहेत, ही मुले सख्खी भावंडे नाहीत आणि तरीही त्यांचे डीएनए एकसारखे आहेत. वैज्ञानिकांनी त्यांना जेनेटिक किंवा अनुवांशिक भावंडे असे म्हटले आहे.

व्हर्जिनिया येथील ब्रीयाना आणि ब्रिटनी या ३५ वर्षाच्या जुळ्या बहिणी. त्यांनी ३७ वर्षाचे जॉश आणि जेरेमी या जुळ्या भावांशी लग्न केले. त्या दोघीनाही लग्नानंतर मुलगे झाले आणि या दोन मुलांच्या जन्मात तीन महिन्याचे अंतर आहे. या दोन्ही मुलांचे डीएनए एकसारखे आहेत. ही मुले आता साधारण वर्षाची आहेत. आई जुळ्या, वडील जुळे असले तर विज्ञान भाषेत याला क्वाटर्नरी ट्वीन्स म्हणतात. जगभरातअसे फक्त ३०० परिवार आहेत. आई वडील जुळे असतील तर जीन्स बरेच समान असू शकतात असे विज्ञान सांगते.