राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तुरुंगात बेशुद्ध, दाखल करण्यात आले रुग्णालयात


मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी तुरुंगात बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना शासकीय जेजे रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

कथित भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात येथील आर्थर रोड तुरुंगात असलेल्या देशमुख यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे तुरुंगातील अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचा रक्तदाब वाढला होता आणि ईसीजी अहवाल असामान्य होता. देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना प्रथम अंमलबजावणी संचालनालयाने आणि नंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.