‘काँग्रेस रिमोटवर चालते’ – गुलाम नबी आझाद यांनी प्राथमिक सदस्यत्वासह दिला पक्षाच्या पदांचा राजीनामा


नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी राजीनामा पत्र पाठवले आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचा मोठा चेहरा मानले जातात. यापूर्वी ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत.


सोनिया गांधींना दिलेल्या राजीनामा पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिले आहे की, अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावनिक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतकीय जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पाच पानांत लिहिलेल्या राजीनाम्यात सोनिया गांधींना कारणे दिली आहेत.