मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, भडकाऊ भाषण प्रकरणी यापुढे चालणार नाही खटला


नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेट स्पीच प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2007 मध्ये सीएम योगी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाखाली सीएम योगी यांच्यावर खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी नाकारली. यापूर्वी मे 2017 मध्ये राज्य सरकारने हा खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. तेव्हा सरकारने सांगितले की, खटल्यातील पुरावे अपुरे आहेत. जे 2018 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कायम ठेवले होते.