अक्षयकुमारच्या ‘कठपुतली’चा ओटीटी रिलीज साठी १८० कोटींचा करार

बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याचे लागोपाठ तीन चित्रपट फ्लॉप झाले आहेत. बच्चन पांडे, पृथ्वीराज आणि रक्षाबंधन या त्याच्या चित्रपटांना यशाची चव चाखता आली नाही. तरीही त्याचा चौथा चित्रपट ‘कठपुतली’ रिलीज साठी तयार झाला आहे. सिरीयल किलर मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटाची कथा घडते कसौली मध्ये. रंजित तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

येत्या २ सप्टेंबरला ‘कठपुतली’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. थेट ओटीटी रिलीज साठी १८० कोटींचा करार केला गेला असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील १३५ कोटी चित्रपटासाठी तर ४५ कोटी संगीत आणि अन्य बाबींसाठी दिले जाणार आहेत. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग, सरगुण मेहता मुख्य भूमिकेत आहेत. अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटात जॉली एलएलबी ३, गोरखा, रामसेतू, सेल्फी, मिशन सिंड्रेला यांचा समावेश आहे. अक्षय कुमार ‘द एंड’ मधून डिजिटल डेब्यू करणार आहे.