Karnataka : कर्नाटकात भीषण अपघात, ट्रकला जीपची धडक, नऊ कामगार ठार, 13 जखमी


बंगळुरू – कर्नाटकातून गुरुवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. जीपची ट्रकला धडक बसली. या अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.

तुमकूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सेराजवळ हा अपघात झाला. अपघातात बळी पडलेले सर्व जीपस्वार रोजंदारी मजूर होते. ते बंगळुरुच्या दिशेने जात होते. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवले. एसपी राहुलकुमार शाहपूरवाडही घटनास्थळी पोहोचले.

जीपमध्ये होते 24 जण
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कामगारांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅक जीप ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. जीपमध्ये 24 जण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी अनेक मुले होती. कर्नाटकचे गृहमंत्री आणि तुमकू जिल्ह्याचे प्रभारी मंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की त्यांनी जिल्ह्याचे उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांशी बोलले आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत आणि जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक, मृतांच्या आश्रितांना प्रत्येकी दोन लाख
या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृत व्यक्तीच्या आश्रितांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50-50 हजारांची मदत दिली जाणार आहे.