एलोन मस्क यांचे जवानीतील फोटो लिलावात

टेस्लाचे सीईओ, स्टार लिंकचे मालक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत एलोन मस्क यांचे काही दुर्मिळ फोटो त्यांच्या माजी मैत्रिणीने लिलावात ठेवले आहेत. जेनिफर ग्वेवेन असे तिचे नाव असून तिच्या सावत्र मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी तिने हे फोटो आणि अन्य काही वस्तू लिलावात ठेवल्याचे समजते. यात मस्क यांचे विविध पोझ मधील फोटो आहेत. प्रत्येक वस्तू साठी बेसिक प्राईज १०० डॉलर्स असून हा लिलाव आर आर ऑक्शन तर्फे केला जात आहे.

मस्क आणि जेनिफर यांचे कॉलेज दिवसातले हे फोटो आहेत. ते दोघे युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया मध्ये शिकत होते आणि एकमेकांना डेट करत होते. जेनिफर ४८ वर्षांची असून हे फोटो १९९४ दरम्यानचे आहेत. १९९५ मध्ये मस्क आणि जेनिफरचे ब्रेकअप झाले होते. या फोटोत मस्क जेनिफरसोबत, कधी मित्रांबरोबर दंगामस्ती करताना, कधी संगणकावर काम करताना दिसत आहेत. असे एकूण १८ फोटो आहेत. तसेच जेनिफरला मस्क यांनी वाढदिवसानिमित्त स्वतःची सही करून दिलेली डॉलरची नोट आणि वाढदिवस कार्ड आहे. तसेच एक १४ कॅरेटचा गोल्ड नेकलेस सुद्धा आहे. यातील डॉलर नोट साठी १४ तर नेकलेस साठी आत्तापर्यंत ८ बोली लागल्या आहेत. मात्र फोटोना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही असे समजते.