LSC Box Office : ‘भूल भुलैया 2’ला मागे टाकत ‘लाल सिंह चड्ढा’ ठरला 2022 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, जाणून घ्या कसा ?


आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर भुकंप ठरला आहे. सुमारे 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सोशल मीडियावर ‘बॉलिवुडचा बहिष्कार’ ट्रेंडचा फटका या चित्रपटाला सहन करावा लागला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली आणि ट्विटरवर #BoycottLaalSinghCaddha ट्रेंड झाला. लाल सिंह चड्ढा 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला, तेव्हा त्यावर ‘Cancel Culture’ चा प्रभाव दिसला. आमिरने लोकांना चित्रपट पाहण्याची विनंतीही केली होती, पण त्याची विनवणी कामी आली नाही. तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉक्स ऑफिसवर घसरण होऊनही हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. इतकेच नाही तर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ आणि आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’सह चार हिंदी चित्रपटांना मागे टाकले आहे. हे कसे घडले? आम्ही तुम्हाला सांगतो.

वास्तविक, आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट भारतातील बहिष्काराच्या ट्रेंडचा बळी ठरला असेल, परंतु परदेशात या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा 2022 चा परदेशात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. आंतरराष्ट्रीय कमाईच्या बाबतीत लाल सिंह चड्ढाने अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात केली इतक्या कोटींची कमाई
बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ने परदेशी बाजारपेठेत दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस $7.5 दशलक्ष (60 कोटी रुपये) कमावले आहेत. दुसऱ्या रिपोर्टनुसार, ‘फॉरेस्ट गंप’च्या या रिमेकने जगभरात 125 कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, 12 दिवसांत केवळ 56.70 कोटी रुपये कमावले आहेत. आता 25 ऑगस्टला विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लिगर’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. अशा स्थितीत ‘लाल सिंह चड्ढा’चा सूपडा साफ होणार असल्याचे बोलले जात आहे.

या चित्रपटांना टाकले मागे

अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ ने चार बॉलीवूड चित्रपटांना टाकले मागे, वाचा संपूर्ण यादी.
1. आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी – परदेशी बाजारात $ 7.47 दशलक्ष कमाई म्हणजेच 59.64 कोटी रुपये
2. कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2- विदेशी बाजारपेठेत $5.88 दशलक्ष कमाई म्हणजेच 46. 30 कोटी रुपये
3. विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्स – परदेशी बाजारपेठेत $ 5.7 दशलक्ष म्हणजेच 45.51 कोटी रुपयांची कमाई
4. वरुण धवन-अनिल कपूरचा जुग जुग जिओ- विदेशी बाजारपेठेत $4.33 दशलक्ष म्हणजे 34.56 कोटी रुपये कमाई

आमिर खान घेणार कामातून ब्रेक!
‘लाल सिंग चड्ढा’चे वाईट नशीब पाहून आमिर खान कामातून ब्रेक घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तो सुमारे 2 महिन्यांसाठी अमेरिकेला जाणार आहे. तेथे तो विश्रांती घेऊन नवीन चित्रपटांबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर तो आता एका स्पोर्ट्स ड्रामा सिनेमात दिसणार आहे. हा एक स्पॅनिश चित्रपट आहे, ज्याचा हिंदीत रिमेक करण्याचा तो विचार करत आहे.