CBI Raid : आरजेडीचे आमदार सुनील सिंग आणि दोन खासदार अशफाक करीम-फैयाज यांच्यावर सीबीआय-ईडीचे छापे, राजकीय वर्तुळात खळबळ


पाटणा : नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नव्या सरकारला आज म्हणजेच बुधवारी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करायचा आहे, मात्र त्याआधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सीबीआयने सत्ताधारी आरजेडीचे एमएलसी सह-कोषाध्यक्ष आणि बिस्कोमनचे अध्यक्ष सुनील सिंग यांच्या घरावर पहाटे छापे टाकण्यास सुरुवात केली. पण त्याहूनही मोठी बातमी समोर आहे आणि ती म्हणजे आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम हेही सीबीआयच्या तावडीत येताना दिसत आहेत. कारण सुनील सिंगसोबतच सीबीआयने पाटण्यातील अशफाक करीमच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत.

मला फसवले जात आहे – सुनील सिंग
सीबीआयच्या या मोठ्या छाप्यानंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येथे RJD MLC आणि Biscoman चे अध्यक्ष सुनील सिंह यांनी म्हटले आहे की त्यांना उगाच गोवले जात आहे. सुनील सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, छापेमारीसाठी आज दिवसच का निवडला? मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर होत आहे.

आरजेडीचे खासदार अश्फाक करीम यांच्या ठिकाण्यांवर छापा
त्याचवेळी सीबीआयने बुधवारी पहाटे आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान सीबीआयच्या पथकाने पाटणा येथील सुनील सिंग आणि अश्फाक करीम यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. सीबीआयच्या अनेक टीम या छाप्यात गुंतल्या असून काही टीम्स बॅकअपमध्येही ठेवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ईडीचे पथकही छापे टाकत आहे.

राजद खासदाराच्या मधुबनी येथील घरावर ईडीचा छापा
इतकंच नाही तर बुधवारीच ईडीने राजदच्या आणखी एका मजबूत नेत्याच्या मुसक्या आवळल्या. लालू यादव यांच्या पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ फयाज अहमद यांच्या घरावर ईडीने पहाटे छापा टाकला. त्यांच्या मधुबनी येथील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. यावेळी ईडीच्या मदतीसाठी सीआरपीएफच्या अधिका-यांसह जवानांची टीमही तेथे उपस्थित होती.

आम्हाला आधीच संशय होता – राजद
सीबीआयच्या या छाप्यानंतर प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरजेडीला पाठिंबा देणाऱ्या स्वतंत्र आमदारांसह अनेक नेते सुनील सिंग यांच्या घराबाहेर पोहोचले. राजद नेत्यांचा आरोप आहे की सीबीआय आणि ईडी हे करू शकतात असा त्यांना आधीच संशय होता, कारण आज नितीश-तेजस्वी सरकारची फ्लोर टेस्ट आहे. नेत्यांना सभागृहात पोहोचू नये, यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचा आरोप आरजेडीने केला आहे.