’50 खोके – एकदम ओके’, विधानसभेच्या आवारात शिंदे गट आणि महाविकास आधाडीचे आमदार आमने-सामने


मुंबई : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष कायम आहे. बुधवारी विधानसभेबाहेर दोन्ही आमदारांच्या आमदारांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी ’50 खोके-एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. विधानसभेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि महाविकास आधाडीचे आमदार आमने-सामने आले.

महाराष्ट्र भाजप आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी गोंधळ घातला आणि एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवला. सत्ताधारी शिंदे आघाडीला चिडवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार गाजर घेऊन पोहोचले होते. त्यावर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली. वाढता तणाव पाहून दोन्ही बाजूचे काही ज्येष्ठ नेते मदतीला आले आणि त्यांनी आमदारांना शांत केले. यानंतर दोन्ही बाजूचे आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी आत पोहोचले.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी संपणार आहे. एकनाथ शिंदे आणि अन्य 39 शिवसेना आमदारांनी जूनमध्ये बंड केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर 30 जून रोजी भाजपच्या पाठिंब्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले.