येतेय ३२५ किमी वेगाने धावणारी लोम्बार्गिनी हुराकेन टेक्निका

देश विदेशात खास आकर्षण असलेल्या लोम्बार्गिनीची नवी हुराकेन टेक्निका उद्या म्हणजे २५ ऑगस्टला सादर केली जात आहे. भारतात एप्रिल मध्ये हुराकेन लाँच केली गेली होती. पण उद्या सादर होत असलेल्या कारची खासियत म्हणजे ते रेस ट्रॅक मॉडेल असून तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३२५ किमी. ० ते १०० किमीचा वेग ही कार फक्त ३.२ सेकंदात घेते.

नावाप्रमाणेच वादळाच्या स्पीडने घावणाऱ्या या कारला व्ही १० नॅचरल इंस्पीरेटेड इंजिन, ७ स्पीड ड्यूल क्लच ऑटो गिअर बॉक्स दिला गेला असून कंपनीच्या सियान मॉडेल वरून प्रेरणा घेऊन तिचे डिझाईन केले गेले आहे. कारचे बम्पर वाय आकाराचे,अपडेटेड विंडो लाईन, नवी २० इंची अॅलोंय व्हील्स, कार्बन फायबर इंजिन कव्हर, कार्बन सीरॅमिक ब्रेस, मागच्या खिडक्या मोठ्या अशी तिची खासियत आहे.

या कारची किंमत जाहीर केली गेलेली नाही. मात्र ती ४.५० कोटीच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. या कंपनीच्या एसटीओ मॉडेलची किंमत ५.७४ कोटी आहे. भारतात ईव्हीओ मॉडेल २.२२ कोटींमध्ये उपलब्ध करून दिले गेले होते.