आर्थिक राजधानीतील हे मोठे हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस तपासात समोर आली ही बाब


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअॅपवरुन आलेल धमकीला अवघे काही दिवस उलटले असतानाच आता मुंबईतील एका मोठ्या हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काही अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून मुंबईतील ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी 6 वाजता एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. बॉम्बचा स्फोट होऊ नये, यासाठी फोन करणाऱ्याने हॉटेल प्रशासनाकडे 5 कोटी रुपये मागितले. हॉटेलने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी सर्वत्र तपास केला, मात्र पोलिसांना काहीही हाती लागले नाही, त्यानंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 385, 336 आणि 507 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

यापूर्वी मिळाली होती 26/11 ची पुनरावृत्ती करण्याची धमकी
मुंबईला पुन्हा 26/11 सारखी परिस्थिती निर्माण करण्याची धमकी देण्यात आली होती. गेल्या शनिवारी सकाळी मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला, ज्यामध्ये मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होणार आहे. या मेसेजमध्ये काही संशयितांचे फोटो आणि नंबरही शेअर करण्यात आले होते. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, मध्य मुंबईतील वरळी येथील नियंत्रण कक्षातून संचालित मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांकावर शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा संदेश आला. या मेसेजमध्ये अजमल कसाब आणि अल जवाहर यांसारख्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला असून हा संदेश पाकिस्तानमधून आला आहे. त्यांनी सांगितले की, या मेसेजमध्ये 26/11 च्या हल्ल्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईला उडवण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

पोलीस म्हणाले- मुंबईला धोका नाही
विवेक फणसाळकर म्हणाले की, आम्ही हा संदेश अजिबात हलक्यात घेतलेला नाही. ते म्हणाले की, मी मुंबईतील लोकांना खात्री देऊ इच्छितो की मुंबई सुरक्षित आहे आणि आम्ही येथे कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही. या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेची तीन पथके गुंतल्याचे त्यांनी सांगितले.