कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 8 हजार 586 नवीन रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेटही वाढला


नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वेग मंदावला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. गेल्या 24 तासातील कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर देशात काल दिवसभरात 8 हजार 586 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, आता या नवीन आकडेवारीनंतर, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 506 झाली आहे. त्याच वेळी, देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 4 कोटी 43 लाख 57 हजार 546 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील मृतांचा आकडाही 5 लाख 27 हजार 416 वर पोहोचला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रिकव्हरी रेटमुळे कोरोनाबद्दलची चिंता कमी झाली आहे. लोकांना अजूनही दररोज कोरोनाची लागण होत आहे, परंतु फारच कमी रुग्णांमध्ये गंभीर स्थिती दिसून येत आहे. त्याच वेळी, संक्रमित रुग्ण एका आठवड्यात व्हायरसपासून बरे होत आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 33 हजार 624 झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 29 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण
लसीकरणाबाबत बोलायचे झाले तर देशात हा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 29 लाख 25 हजार 342 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, लसीकरणाची एकूण संख्या 210 कोटी 31 लाख 65 हजार 703 झाली आहे.