पुण्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे एलन मस्कला भेटण्याचे स्वप्न साकार, म्हणाला- हे कधी पाहिले नाही…


एलन मस्क हे जगातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते टेस्ला मोटर्सचे सीईओ आहेत. मस्क आणि त्यांची कंपनी टेस्ला यांनी बनवलेल्या कारचे लाखो लोकांना वेड लागले आहे. प्रत्येकाला त्यांना भेटून व्यावसायिक सल्ला घ्यायचा आहे, तसेच त्याच्यासारखा यशस्वी उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील पुणे येथे राहणारा प्रणय पाथोळे हा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. पाथोळे हा एलोन मस्कचा डाय हार्ट फॅन आहे. प्रणय पाथोळेचे स्वप्न होते की एके दिवस एलन मस्कला भेटण्याची संधी मिळेल.

प्रणयचे स्वप्न झाले पूर्ण
23 वर्षीय प्रणय पाथोळे हा मशिन लर्निंग इंजिनीअर आहे, त्याला स्पेस आणि रॉकेटबद्दल शिकायला आवडते. सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रणय पाथोळे याचे स्वप्न आता साकार झाले आहे. प्रणयला अमेरिकेत त्याच्या आयडॉल मस्कला भेटण्याची संधी मिळाली. स्वतः पाथोळे याने ट्विट करून ही माहिती दिली आहे.


ट्विट करुन दिली माहिती
एलन मस्कला भेटल्यानंतर प्रणय पाथोळेने एक फोटो ट्विट केला आणि म्हटले की, एलन मस्क यांना गिगाफॅक्टरी, टेक्सास येथे भेटून खूप आनंद झाला. इतका नम्र आणि साधा माणूस मी पाहिला नाही, तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात.

चार वर्षांपूर्वी साधला होता संवाद
प्रणय पाथोळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करतो. ट्रिलियनियर मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवरील विविध समस्यांवरील संदेशांमध्ये टेक मोगल एलन मस्क यांच्याशी नियमितपणे बोलतो. या तरुण अभियंत्याने चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एलन मस्कशी पहिल्यांदा संवाद साधला.