झाकीर नाईकचा हवाला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले नुपूर शर्माचे समर्थन


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. नुपूर शर्मा यांनी माफी मागावी अशी सर्वांची मागणी होती, मात्र मी त्यांचे समर्थन करत असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे म्हणाले की, नुपूर शर्मा ज्या बोलल्या ते डॉ झाकीर नाईक यांनी आधीच सांगितले आहे, मात्र त्यांच्याकडून माफी मागण्याची कोणीही मागणी केलेली नाही. ठाकरे म्हणाले की, ओवेसी बंधू आमच्या देवी-देवतांना नीच म्हणतात.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना मनसे प्रमुखांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाजप-शिवसेनेची युती झाल्यास अडीच वर्षे मुख्यमंत्री होण्याच्या दाव्यावर त्यांना कोंडीत पकडले.

मनसे प्रमुख म्हणाले की, मी शिवसेनेत असताना बाळासाहेबांनी ठरवले होते की ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल. आधीच ठरलेल्या गोष्टी तुम्ही कशा बदलू शकता. त्याही बंद दारआड. ठाकरे म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री) मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते, मग तुम्ही आक्षेप का घेतला नाही.