ब्रिटीश सुपरकारची भारतीय बाजारात एन्ट्री

ब्रिटीश लग्झरी कार्स कंपनी मॅकलारेन भारतीय ऑटो बाजारात एन्ट्री होत आहे. त्यांचे पहिले आऊटलेट ऑक्टोबरमध्ये मुंबईत सुरु होत आहे. या आउटलेट मध्ये मॅकलारेन त्यांची पूर्ण शृंखला विक्री, विक्री पश्चात सेवा, सर्व्हिसिंग अश्या सर्व सुविधा मिळणार आहेत.

मॅकलारेनची प्रत्येक कार कंपनीच्या युके मधील कारखान्यात हाताने तयार केली जाते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हॅरीस म्हणाले, भारतीय बाजारात आमचे आउटलेट हा जागतिक विस्तार योजनेचा महत्वाचा टप्पा आहे. आशिया प्रशांत क्षेत्रात अगोदरच आम्ही जम बसविला आहे. भारतीय बाजार हे आमचे ४१ वे जागतिक क्षेत्र आहे. मुंबईच्या आउटलेटची जबाबदारी ललित चौधरी यांच्या कडे दिली जात आहे.

भारत हा ऑटो क्षेत्रातला एक महत्वाचा बाजार आहे. आमचे निवडक ग्राहक आणि प्रशंसक येथे आहेत. कंपनी त्यांची नवी आर्टूरा भारतात आणत आहे. ही कंपनीची नवी हाय परफॉर्मन्स हायब्रीड सुपर कार आहे.