वाढत्या महागाईमुळे ब्रिटिश महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास पाडले भाग, व्यवसायात झाली अशा टक्केवारीने वाढ


लंडन – ब्रिटनसारख्या समृद्ध देशातही वाढती महागाई आता लोकांना त्रासदायक ठरु लागली आहे. महागाईमुळे आता महिला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेश्याव्यवसाय करू लागल्या आहेत. इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रोस्टिट्युट्स नावाच्या संस्थेच्या अहवालानुसार, वाढत्या महागाईमुळे आता वेश्या व्यवसायात पूर्वीच्या तुलनेत अनेक पटींनी वाढ झाली आहे. महिलांना वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी ही संस्था मदत करते.

स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महिलांनी त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देहविक्रय व्यापार सुरू केला आहे. उत्तर लंडनमधील ही राष्ट्रीय संस्था लैंगिक कार्याच्या सर्व क्षेत्रात महिलांना स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल सल्ला देते. यासोबतच स्त्रिया इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रोस्टिट्युट्सचा कायदेशीर सल्लाही घेत असतात. संस्थेच्या म्हणण्यानुसार असा सल्ला घेणाऱ्या महिलांमध्ये आता 33 टक्के वाढ झाली आहे.

मागील 30 वर्षांपासून हजारो महिलांना मदत करणाऱ्या प्रवक्त्या निक्की अॅडम्स म्हणाल्या की, जगण्याच्या वाढत्या खर्चामुळे महिला आता रस्त्यावर, कॅम्पस किंवा ऑनलाइन अशा विविध मार्गांनी स्वत:ला लैंगिक कृत्यांमध्ये ढकलत आहेत. वेश्याव्यवसायातून मिळालेल्या पैशातून या महिला आता घर चालवत आहेत.

पाळीव कुत्रे आणि मांजरांना अन्न देणे कठीण
वाढत्या महागाईच्या तडाख्यात जनावरेही येत आहेत. लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना आहार देण्यात अयशस्वी झाल्यानंतर, RSPCA संस्थेने गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये 19,500 कुत्रे आणि मांजरींना अन्न पुरवले, जे जानेवारीत नऊ हजार होते. अन्नाअभावी प्राणी मरू नयेत म्हणून ही संस्था जनावरांना अन्न पुरवते.