आज एक लाखाहून कमी झाले सक्रिय कोरोना रुग्ण, 11,539 नव्या बाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सक्रिय बाधितांची संख्या एक लाखाच्या खाली पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आता 99,879 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, शनिवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 1,01,166 होती.

ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारच्या तुलनेत आज नवीन कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आज देशात 11,539 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, शनिवारी देशात 13,272 नवीन कोरोना बाधित आढळले होती.

दिल्लीत कोरोनाची दहशत
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी दिल्लीत संसर्गाची भीती आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 1109 नवीन रुग्ण आढळले असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत संसर्गाचे प्रमाण 11 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या 20 दिवसांत येथे 100 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.