Russia: युक्रेन युद्धाचा आणि पुतिन यांचा मास्टरमाइंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुगिन यांच्या मुलीची हत्या


मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी डारिया दुगिन हिची हत्या करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॉस्कोमध्ये कार बॉम्बस्फोटात तिचा मृत्यू झाला. असेही बोलले जात आहे की हल्लेखोरांचे लक्ष्य डारिया दुगिनचे वडील अलेक्झांडर होते, ज्यांना ‘पुतिन यांचा मेंदू’ म्हणूनही ओळखले जाते.

युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ब्रिटनने बंदी घातलेल्या रशियन लोकांमध्ये अलेक्झांडर दुगिन आणि त्याचा डारिया दुगिन यांचाही समावेश असल्याचे काही अहवालातून समोर आले आहे. डारिया दुगिन ही एक रहस्यमय लेखिका म्हणूनही ओळखली जाते.

युक्रेन हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे अलेक्झांडर
अलेक्झांडर दुगिन, 60, हे रशियन राजकीय तत्वज्ञानी आणि विश्लेषक आहेत. क्रिमिया आणि युक्रेनवरील हल्ल्यांचे ते मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. 2015 मध्ये, अमेरिकेने दुगिनवर बंदी घातली. याशिवाय काही युरोपीय देशांनीही क्रिमियाला जोडल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर निर्बंध लादले होते.