भारताचा झिम्बाब्वेवर पाच गडी राखून विजय, वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी


हरारे – एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेच्या 161 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने 25.4 षटकात 167 धावा करत सामना जिंकला.

तत्पूर्वी झिम्बाब्वेचा संघ प्रथम खेळून केवळ 161 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 25.4 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने नाबाद 43 धावा केल्या. त्याचवेळी दीपक हुडा आणि शिखर धवन यांनी 33-33 धावांची खेळी केली. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले.