पिझ्झा, हॉट डॉग खाता? मग हे वाचाच

जंक फूड आज जगभरात सर्वत्र लोकप्रिय आहे. अश्या पदार्थांमुळे आरोग्याला नुकसान होते याची जाणीव सर्वाना आहे. मात्र एकदा का या पदार्थांची चटक लागली की ती सुटणे कठीण. आपण सेवन करत असलेल्या अन्नाचा थेट आरोग्याशी जसा संबंध असतो तसाच तो दीर्घायुष्याशी सुद्धा असतो हे नुकतेच एका केल्या गेलेल्या संशोधनातून समोर आले आहे. मिशिगन युनिव्हर्सिटी मधील संशोधकांनी सुमारे ६०० लोकांवर आहार सवयी आणि त्याचा आयुष्यमानाशी असलेला संबंध या बाबत हे संशोधन केले.त्यात काही पदार्थ सतत खाल्याने आयुष्य कमी होते तर काही पदार्थ खाल्ल्याने आयुष्य वाढते असे दिसून आले आहे.

आपण एखाद्या पदार्थाचे सेवन केल्याशिवाय राहू शकत नाही असे तुम्हाला वाटते तेव्हा त्या पदार्थाचे व्यसन लागले आहे असे खुशाल समजावे. पिझ्झा, हॉट डॉग, बर्गर, चीज बर्गर, प्रोसेस्ड मीट, बीफ, चॉकलेट, झिंगा असे सुमारे ५८०० पदार्थ आयुष्य कमी करतात असा दावा केला गेला आहे. पण तरीही हे पदार्थ खाल्ले जातात त्याचे कारण ते खाल्ल्याने मेंदूला येणारी ‘फील गुड’ संवेदना. मेंदू मध्ये अशी एक व्यवस्था असते ज्याला रिवार्ड सिस्टीम म्हटले जाते. मेंदूला आनंद देणारे डोपाइन हार्मोन रिलीज करणारी ही व्यवस्था. वरील पदार्थांच्या सेवनाने ही रिवार्ड सिस्टीम अधिक प्रमाणात कार्यान्वित होते असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या संशोधकांच्या दाव्यानुसार तुम्ही एकदा पिझ्झा खाल्ला तर तुमचे आयुष्य ८ मिनिटांनी कमी होते. हॉट डॉग खाल्ला तर ते ३६ मिनिटांनी कमी होते. एक सिगरेट ओढली तर ११ मिनिटांनी, प्रोसेस्ड मीट खाल्यास २६ मिनिटे, चीज बर्गरमुळे ९ मिनिटे तर सॉफ ड्रिंक घेतल्यास १३ मिनिटांनी आयुष्य कमी होते.

या उलट अवकाडो, केळी, टोमाटो, सामन मासे, पिनट बटर जॅम सँडविच हे पदार्थ आयुष्य वाढवितात असा दावा केला जातो. एक आवाकाडो खाल्ल्यास दिड मिनिट, टोमाटो खाल्ल्यास ४ मिनिटे, केळे खाल्ल्यास १३.५ मिनिटे, पिनट बटर सँडविचने ३३ मिनिटे आयुष्य वाढते असे या संशोधकांचे निष्कर्ष आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही