युएस ओपन मध्ये यंदा विजेत्याला मिळणार २६ लाख डॉलर्स

चार ग्रँड स्लॅम पैकी एक असलेल्या युएस ओपन टेनिस स्पर्धा यंदा २९ ऑगस्ट पासून सुरु होत आहेत. त्यात एकेरी विजेत्याला २६ लाख डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर केले गेले आहे. यंदा प्रथमच एकूण बक्षिसांची रक्कम ६ कोटी डॉलर्सवर गेली आहे. अमेरिकन टेनिस संघाने गुरुवारी या संदर्भातील पत्रक जारी केले आहे.

मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश केलेल्या खेळाडूला ८० हजार डॉलर्स, दुसरी फेरी गाठणाऱ्या खेळाडूला १,२१,००० डॉलर्स, पहिल्या फेरीत हरणाऱ्या खेळाडूला ५८ हजार डॉलर्स, उपउपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या खेळाडूला ४,४५,००० डॉलर्स, उपांत्य फेरीत विजेत्याला ७०,५०० डॉलर्स मिळणार आहेत तर उपविजेत्याला १३ लाख डॉलर्स मिळणार आहेत.

करोना पूर्वी २०१९ मध्ये झालेल्या युएस ओपन मध्ये चँपियनला ३९ लाख डॉलर्स मिळाले होते. गतवर्षी एकूण बक्षीस रक्कम ५.७५ कोटी डॉलर्स होती. यंदा ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये ५.२० कोटी डॉलर्स तर विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन मध्ये बक्षीस रक्कम ४.९० कोटी डॉलर्स होती. यंदा अमेरिकन ओपन मध्ये रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार असल्याचे अगोदरच जाहीर केले गेले आहे.