पॅन कार्डमधील नाव घरबसल्या करा दुरुस्त, फक्त 5 मिनिटांची आहे संपूर्ण प्रक्रिया


सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांच्या यादीत पॅन कार्डचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आता पॅनकार्डशिवाय अनेक महत्त्वाची कामे करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला पॅन कार्ड अद्ययावत ठेवावे लागेल. अनेकवेळा पॅनकार्डमधील नाव चुकलेले असते. ते दुरुस्त करण्याआधी, तुम्हाला केंद्रांवर फेऱ्या मारण्याची भीती वाटू लागते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक प्रक्रिया सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड दुरुस्त होईल.

पॅन कार्ड दुरुस्तीसाठी तुम्हाला अधिकृत साइट (https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html) ला भेट द्यावी लागेल. येथे गेल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसेच, येथे तुम्हाला सर्व माहिती भरताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल, कारण चुकीमुळे पॅन कार्ड दुरुस्त करणे शक्य होणार नाही.

जर तुम्हाला दुरुस्त्या करायच्या असतील, तर तुम्हाला सर्वात वरती Application Type वर क्लिक करावे लागेल. Application Type वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Changes or Correction पर्याय निवडावा लागेल. तसेच तुम्हाला Category दिसेल. कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला वैयक्तिक निवडावे लागेल, जर तुमच्या पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल, तर तुम्हाला येथे वैयक्तिक माहिती देखील द्यावी लागेल.

किती फी भरावी लागेल?
पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला 96 रुपये द्यावे लागतील. हे पेमेंट कसे केले जाऊ शकते? जर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला कार्डद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय आहे. तुम्ही डीडीच्या मदतीने देखील पेमेंट करू शकता. डीडी किंवा चेकद्वारे पेमेंट करताना, त्यावर वापरकर्त्याचे नाव असणे देखील आवश्यक आहे. पेमेंट पूर्ण झाल्यावर, पॅन कार्ड विनंती सबमिट केली जाते. येथून तुम्ही सहज पेमेंट करू शकता.