सलमान बिग बॉस १६ साठी घेणार १ हजार कोटी मानधन?
टीव्ही वरील वादग्रस्त तरी लोकप्रिय रिअलिटी शो बिग बॉस १६ लवकरच सुरु होत आहे. मिडिया रिपोर्ट नुसार या नव्या सिझन साठी होस्ट सलमान खान १५ व्या सिझनच्या तिप्पट रक्कम मानधन म्हणून घेणार आहे. बिग बॉस सिझन १५ साठी सलमानला ३५० कोटी रूपये दिले गेले होते. त्यामुळे बिग बॉस १६ साठी सलमानने १ हजार कोटींची मागणी गेल्याचे समजते. पण कंपनी त्याला ५०० कोटींवर राजी करेल असेही सांगितले जात आहे.
ऑक्टोबरच्या सुरवातीला हा शो सुरु होत असून त्याच्या सेटचे फोटो लिक झाले आहेत. त्यावरून यंदाची थीम अॅक्वा असेल असे संकेत दिले गेले आहेत. कारण सेटच्या इंटिरियरमध्ये निळ्या रंगाचा वापर अधिक केला गेला आहे. या वेळीही स्पर्धकांना काही कसोट्या पार करूनच प्रवेश करता येणार आहे. बिग बॉस १५ मध्ये टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश विजयी ठरली होती. प्रतिक शेजपाल फर्स्ट रनर अप तर करन कुंद्रा सेकंद रनर अप ठरला होता.
यंदाच्या शो मध्ये मोहित मलिक, नकुल मेहता, राज अनादकट, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टीना दत्त, पूनम पांडे व बशीर अली हे स्पर्धक सहभागी होतील असे समजते.