West Bengal : सुवेंदूंचा दावा-‘डिसेंबरपर्यंत फुटणार तृणमूल काँग्रेस’, बंगालमध्ये होणार महाराष्ट्राची पुनरावृत्ती?


दिघा – भाजप नेते आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ईडी आणि सीबीआय त्यांचे काम करत आहेत. टीएमसीचे नाव न घेता ते म्हणाले की हा पक्ष सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही.

बंगालमधील भाजपचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसीसाठी डिसेंबर ही अंतिम मुदत मानत असल्याचा मोठा दावा केला. अधिकारींच्या या दाव्यामुळे बंगालमध्येही महाराष्ट्रासारखे राजकीय वादळ येणार आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.