IT Rules, 2021 : देशविरोधी व्हिडिओ दाखवणाऱ्या सात यूट्यूब चॅनेलवर बंदी, त्यांचे होते 85 लाख सदस्य


नवी दिल्ली – भारत सरकारने आयटी कायदा 2021 अंतर्गत सात भारतीय आणि एक पाकिस्तानी यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. या YouTube चॅनेलचे व्ह्यूज 114 दशलक्षांपेक्षा जास्त होते आणि सदस्यांची संख्या 85 लाख 73 हजारांहून अधिक होती. या वाहिन्यांवर जाहिरातीही येत होत्या.

हे चॅनेल ब्लॉक केले

  • Loktantra Tv- 23,72,27,331 व्ह्युज, 12.90 लाख सदस्य
  • URV TV – 14,40,03291 व्ह्युज, 10.20 लाख सदस्य
  • AM Razvi – 1,22,78,194 व्ह्युज, 95,900 सदस्य
  • Gouravshall Pawan Mithilanchal – 15.99.32,594 व्ह्युज, 7 लाख सदस्य
  • Sep TOpSTH- 24,83,64,997 व्ह्युज, 33.50 लाख सदस्य
  • Sarkari Update – 70,11,723 व्ह्युज, 80,900 सदस्य
  • Sab Kuch Dexho – 32,86,03,227 व्ह्युज, 19.40 लाख सदस्य
  • News ki Dunva (पाकिस्तानी) – 61,69,439 व्ह्युज, 97,000 सदस्य

गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की सरकारने 2021-22 या वर्षात बनावट बातम्या पसरवण्यासाठी 94 यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यासोबतच 19 सोशल मीडिया अकाऊंट आणि 747 यूआरएलवरही बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.