महाराष्ट्रात दहीहंडीची तयारी जोरात

देशभर १९ ऑगस्ट रोजी दही हंडी साजरी केली जात असून महाराष्ट्रात दोन वर्षांच्या करोना काळानंतर यंदा प्रथमच बंधने उठविली गेल्याने हा उत्सव दणक्यात साजरा केला जात आहे. त्यासाठी दही हंडी मंडळे जशी कामाला लागली आहेत तसेच गोविंदा पथके सुद्धा जोराने सराव करू लागली आहेत. मुंबई मध्ये दही हंडी उत्सव हे मोठे प्रस्थ असून त्यात राजकीय सहभाग असतो. अनेक राजकीय पक्षांचे नेते दही हंडी मंडळांचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे येथे हंडी फोडणाऱ्या पथकांसाठी लाखो, कोट्यावधी रकमेची बक्षिसे लावली जातात. उंच तारेवर बांधलेली दहीहंडी मानवी मनोरे रचून फोडली जाते आणि हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानने दही हंडी कार्यक्रमात गेल्या काही वर्षात अफाट लोकप्रियता मिळविली आहे.२०१२ मध्ये जयजवान गोविंदा मंडळने नऊ पायऱ्यांचा मनोरा रचून ४३.७९ फुट उंचीवर बांधलेली हंडी फोडून गिनीज रेकॉर्ड केले होते. या दहीहंडी उत्सवाची बक्षीस रक्कम १ कोटींवर होती पण यंदा २१ लाखाचे इनाम ठेवले गेले आहे.मनसेचे अविनाश जाधव यांनी सुद्धा त्यांच्या मालाड येथील दही हंडी साठी २१ लाखाचे इनाम जाहीर केले आहे.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी राजनीतिक असून पूर्ण मुंबईतील गोविंदा येथे येतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील दही हंडी मध्ये बॉलीवूड सितारे दर्शन देतात. येथे प्रचंड गर्दी असते. त्यांनीही यावेळी २१ लाखाचे इनाम जाहीर केले आहे. दादरच्या छबीलदास लेन मधील दही हंडी मध्ये दरवर्षी पुरुष आणि महिला गोविंदा पथके सहभागी होतात. येथील गर्दीचे ते मोठे आकर्षण आहे. या ठिकाणी यंदा ११ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. दही हंडी सुख समृद्धी करता साजरी केली जाते.