आयसीसीचा फ्युचर प्रोग्राम जाहीर, मिळणार क्रिकेटचा बुस्टर डोस

आयसीसीने २०२३-२०२७ या काळासाठी पुरुष क्रिकेटचा फ्युचर टूर प्रोग्राम जारी केला असून या चार वर्षात क्रिकेट प्रेमीना क्रिकेटचा बुस्टर डोस मिळणार आहे. या काळात एकूण ७७७ सामने खेळले जाणार आहेत. त्यात १७३ कसोटी, २८१ वनडे आणि ३२३ टी २० चा समावेश आहे. एकूण १२ देशांसाठी हा प्रोग्राम असून त्यात गतवर्षापेक्षा ८३ सामने अधिक खेळविले जाणार आहेत. या शिवाय आयपीएल साठी आयसीसी ने वेगळा अडीच महिन्याचा वेळ दिला असून या काळात आंतरराष्ट्रीय सामने खेळविले जाणार नाहीत. मार्च मध्य ते मे अखेर अशी ही विंडो असून सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू या काळात फक्त आयपीएलवर लक्ष केंद्रित करतील.

भारताचा विचार केला तर या काळात टीम इंडिया ३८ एकूण ३८ कसोटी खेळणार आहे. त्यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सर्वाधिक सामने होतील. इंग्लंड २२, ऑस्टेलिया २१ आणि भारत २० सामने खेळेल. भारत ४२ वनडे आणि ६१ टी २० सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे यात भारत पाकिस्तान द्विपक्षीय सिरीज होणार नाही.

आयसीसी इव्हेंटची सुरवात पुढच्या वर्षी भारतात वन डे वर्ल्ड कप, २०२४ मध्ये वेस्ट इंडीज व युएसए यांच्या यजमानपदाखाली टी २० वर्ल्ड कप, २०२५ मध्ये पाकिस्तानात चँपियन ट्रॉफी, आणि भारत श्रीलंका संयुक्त २०२६ टी २० वर्ल्ड कप, २०२७ मध्ये द. आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया संयुक्त वन डे वर्ल्ड कप अशी आहे.