या पंतप्रधानांची स्वातंत्रदिनी तिरंगा फडकविण्याची हुकली संधी

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाला यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकाविला. हा क्षण कोणत्याही पंतप्रधानांसाठी खास असतो. इतकेच नव्हे तर प्रत्येक पंतप्रधानाला ही इच्छा असतेच. यंदा मोदींनी ९ व्या वेळी हे भाग्य अनुभवले. पण भारताच्या इतिहासात दोन पंतप्रधान असेही झाले कि ज्यांना लाल किल्यावर तिरंगा फडकविण्याची संधीच मिळाली नाही.

स्वातंत्रदिनी सर्वाधिक वेळा तिरंगा फडकविण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे जातो. त्यांनी १७ वेळा हा मिळविला आहे. पण नेहरू यांच्या निधनानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेले गुलझारीलाल नंदा यांना हा मान मिळाला नाही. विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर सुद्धा काळजीवाहू पंतप्रधान गुलझारीलाल नंदाच होते. पण पहिल्या वेळी २७ मे ते ९ जून व दुसऱ्यांदा ११ जानेवारी ते २४ जानेवारी या काळातच ते पंतप्रधान होते आणि तेव्हा स्वातंत्रदिन नव्हता.

१० नोव्हेंबर १९९० मध्ये पंतप्रधान बनलेले चंद्रशेखर यांनाही ही संधी मिळाली नाही. कारण ते २१ जून १९९१ मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे त्यांनाही स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्याची संधी मिळाली नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १६ वेळा हा मान मिळविला तर मनमोहन सिंग यांनी १० वेळा. गैर कॉंग्रेस सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेई यांनी ६ वेळा हा मान मिळविला होता.